जळगाव मिरर | १ जून २०२५
कामानिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख १० हजार रुपये, सोन्याचे दागिने तसेच चांदीचे देवीदेवतांचे शिक्के चोरुन नेले. ही घटना दि. २० ते दि. २४ मे दरम्यान देविदास कॉलनीत घडली. या प्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील देविदास कॉलनीतील रोहिनी श्याम जगताप (वय ५६) या वास्तव्यास आहे. त्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या होत्या. त्यावेळी बंद दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख १० हजार रुपये, १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, देवीदेवतांच्या चांदीच्या शिक्क्यांची माळ, चांदीची कुहिरी, घड्याळ असा मुद्देमाल चोरून नेला. घरमालक घरी आले त्यावेळी ही चोरी लक्षात आली. त्यांनी मुद्देमालाचा शोध घेतला मात्र तो न सापडल्याने दि. ३० मे रोजी रोहिणी जगताप यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.




















