जळगाव मिरर | १ जून २०२५
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील (वय ३४) यांचा मृतदेह नशिराबादनजीक एका विहिरीत तरंगताना आढळला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव नशिराबाद शिवारात एका विहिरीमध्ये पुरुषाचा मृतदेह तरगंत असल्याची माहिती गावात वाऱ्या सारखी पसरली. नशिराबाद पोलिसांनी जाऊन खात्री करीत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्या वेळी हा मृतदेह गाडेगाव येथील दीपक पाटील यांचा असल्याची ओळख पटली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















