
कार्यसम्राट युवा नेतृत्व प्रतापराव पाटील तरुणाईला भावणारे नेतृत्व !
वडिल नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना आदर्श मानत, वडिलांनी केलेल्या सामाजिक कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रतापराव पाटील यांनी जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत.अल्पावधीतच आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा ठसा उमटविला आहे. उद्याला जळगाव जिल्हा नाहि तर महाराष्ट्र राज्याचे उद्योयन्मुख युवा नेता प्रतापराव पाटील असतिल. आज रोजी ग्रामीण भागात सर्वसाधारण गोरगरीब जनता यांच्या अडीअडचणी समजून गाव पातळीवर जाऊन प्रताप भाऊ ग्रामीण भागाचे अष्टपैलू नेतृत्व करत आहेत. प्रताप भाऊ मंत्री मोहदय यांचे सुपुत्र आहेत. पण या गोष्टीचा कधी गर्व करत नाहीत. विरोधक पण या गोष्टीचे समर्थन करतील,
जळगाव ग्रामीण मतदार संघात व जळगाव जिल्हात नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना जनता नशिबवान समजते.की नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना प्रताप भाऊ सारखा मुलगा आहे, प्रताप भाऊ कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मी मंत्र्याचा मुलगा आहे असं कधिही वागत नाही, खरोखरच मित्रांनो मी त्या भाग्यशाली लोकांपैकी एक आहे,ज्यांचे मित्र व नेते प्रतापराव गुलाबराव पाटील आहेत.घरात समृद्ध राजकीय वारसा असतांना सुद्धा एका सामान्य कार्यकर्ता प्रमाणे जमिनी स्तरावर काम करून प्रताप भाऊ यांनी आपला वेगळा ठसा समाजात निर्माण केला आहे.
नामदार गुलाबराव पाटील साहेब यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. मतदार संघातील सर्व जबाबदाऱ्या प्रतापराव समर्थपणे सांभाळताना दिसतात.सकाळी ८ वाजता घरातुन निघायचे रात्री परत येण्याची वेळ निश्चीत नाही अशी प्रतापरावांची दिनचर्या, दिवसभर लग्न, व्दारदर्शन, प्रत्येकाच्या सुखदुःखात , सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे रात्री मतदार संघात कुठे किर्तन असेल तर कीर्तनात जाणे प्रताप भाऊ यांचा नित्यक्रम असतो.
उद्याची पिढी ज्यांना नेता मानते त्या कर्तृत्ववान नेत्या बद्दल थोडक्यात विचार मांडणे हे कठीणच आहे.खुप मोठ्या माणसाचा मुलगा असुन,कुढलाहि गर्व नसणारा वाड्यावस्त्यात जाऊन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा आधार देणारा. राजकारणात येणाऱ्या तरुणांच्या मैत्रीच्या व्याख्यात तंतोतंत बसणारा निगर्वी युवा नेता म्हणजेच प्रताप भाऊ. राजकारण बाजूला ठेवून आपण मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहोत . मंत्री महोदयांनी दिलेली शिकवण म्हणून विरोधक का असेना त्यात कुढलेहि राजकारण न करता प्रत्येकाला मदत करतांना प्रताप भाऊ आपण पाहिले आहेत.काहि व्यक्ती त्यांच्या नावाप्रमाणे कर्तृत्वदार्ह असतात . त्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे प्रताप भाऊ.सर्व सामान्य कार्यकर्त्यांना योग्य तो मानसन्मान देणारा . वारकरी संप्रदायाची सेवा करणारा किर्तनात हरिनामात रंगुन जाणारा .असा युवा नेता आपण कुठेच पाहिला नसेल.
ह्या सर्व गोष्टी करत असतांना शिक्षण . संस्थांच्या व्यवस्थापनात प्रताप भाऊ कसलीही उणीव भासु देत नाही.सर्व शिक्षण संस्थाचे व्यवस्थापण उत्कृष्टरित्या सांभाळून त्यांनी तरुणाई पुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे तसेच सवलती सोबत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची प्रेरणा देण्याचे काम प्रताप भाऊ नेहमी करत असतात. नवोदित संशोधकांना प्रेरणा देण्यासाठी खुल्या हाताने आर्थिक मदत करण्यातही त्यांचा हात मागे सरत नाही.व्यसना पासून दुर रहा असा संदेश युवकांना देत आई वडिलांच्या मुलाकडुन खुप अपेक्षा असतात या अपेक्षा पूर्ण करण्याबाबत अनमोल मार्गदर्शन प्रताप भाऊ तरुणांना कायम करत असतात असा हा उद्याची तरूण पिढी घडवणारा कुठलेही व्यसन नसणारा हरीनामात रमणारा राजकारणातील युवा नेता उद्याला विधान परिषद निवडणुकीत आमदार होऊन जळगाव जिल्हाच नाहितर संपूर्ण राज्यात युवक पिढि साठी आदर्श घडवेल , प्रताप भाऊ विधान परिषद आमदार करणे म्हणजे नवतरुण पिढी साठी खुप मोठा आदर्श राहिल
जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व नेत्यांनी जिल्ह्यातील विद्यार्थी,तरुण यांच्या आग्रहाखातर प्रतापभाऊ यांची विधान परिषद आमदार म्हणून वर्णी लावावी.
सन्मानिय प्रतापभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त ( दुःख अळवायला उंबरा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जिवणभर तुझी ) हि कवितेतील ओळ आठवली असा या थोर मोठ्या मित्रास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
शुभेच्छुक नाटेश्वर पवार
जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव






















