जळगाव मिरर | ६ सप्टेबर २०२४
गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजेच्या धक्का बसल्याने अनेकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडत असतांना आता जळगाव शहरातील एका परिसरातील २४ वर्षीय तरुणीला विजेचा धक्का लागल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवार दि.५ रोजी घडली. याप्रकरणी सायंकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सोमानी गल्ली येथील रंजिता राहूल सोनार (वय २४) ही युवती कुटुंबासह सोमाणी गल्लीत वास्तव्याला होती. गुरूवारी (दि.5) रोजी घरी काम करत असतांना तिला अचानक इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी युवतीस मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.