जळगाव मिरर / १३ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहरातील एका परिसरात असलेल्या प्रसिद्ध हॉटेलमधून एकाने ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरी केल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या प्रसिद्ध हॉटेलमधील रूम न ३०७ मध्ये असलेल्या नितीन बाबुराव सपकाळे (वय ४८) यांची दि ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास याच हॉटेल मधील रूम सर्विस देणारा इसम संशयित आरोपी विजय गौतम अहिरे (वय ३५) याने रूममधील ५० हजार रुपये किमतीची ९ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने संशयित आरोपी विरोधात फिर्यादी नितीन सपकाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रफुल्ल धांडे हे करीत आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक केली आहे.
