जळगाव मिरर | २ नोव्हेंबर २०२५
राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी महायुतीची तयारी सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेत महायुतीसाथी नेत्यानी हात झटकले आहे. तर आता जळगाव शहरात नुकतेच ठाकरे गटाला धक्का देत दोन माजी महापौरांसह काही नगरसेवक भाजपात दाखल झाले आहे. मात्र आता महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेचा येत्या मनपा निवडणुकीत दगाफटका होण्याची मोठी शक्यता मानली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ठाकरे गटाचे दोन माजी महापौर व काही नगरसेवकांनी भाजपात दाखल झाले आहे. त्यामुळे भाजप निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असून ते आता नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहे. मात्र जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती झाली तरी देखील शिंदेंच्या शिवसेनेनेकडून १५ ते २० जागा मागण्याची शक्यता आहे मात्र यंदाच्या मनपातील निवडणुकीत शिवसेनेला दोन किंवा तीन जागा सोडल्या तर बाकी जागेवर शिंदेंच्या सेनेच्या उमेदवारांचा घात होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे जळगाव शहरात महायुती असली तरी भाजपचेच असंख्य उमेदवार लढत देतील आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी अनेक बंडखोर उमेदवार उभे करून शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करण्यात येवू शकतो. यासाठी गेल्या काही दिवसापासून दिग्गज मंडळी चक्रव्युव्ह आखण्यासाठी सज्ज झाले आहे.
भाजपच्या बंडखोरांचे काय ?
सन 2019 मध्ये भाजपने एक हाती सत्ता मिळवली होती मात्र दोन ते अडीच वर्षात भाजपातील काही नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने भाजपची सत्ता उलथविण्यात ते नगरसेवक यशस्वी झाले होते. आता ते नगरसेवक शिंदे सेनेच्या गटात असले तरी त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळू नये किवा उमेदवारी जरी मिळली तरी त्यांना पराभव होण्यासाठी आतापासूनच सूत्रे हलविले जात आहे.




















