जळगाव मिरर / २३ एप्रिल २०२३ ।
महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शनिवारी, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून रोझ गार्डनपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदीप वाणी (बसवे), उपाध्यक्ष गजानन आकाशे, कार्याध्यक्ष विशाल लिंगायत, संदीप मिटकरी, समीर गुळवे, दीपक गवळी, कृष्णा गवळी, सतीष प्रभाकर ज्ञाने, राजेश गंभीरे, किरण तोडकरी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. रोझ गार्डन, नेहरू चौक, टॉवर चौक, महापालिका मार्गे गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. महात्मा बसवेश्वर यांच्या वचनांच्या फलकाचे काव्य रत्नावली चौकात मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.