
जळगाव मिरर | ६ जून २०२४
लोकसभेच्या निकालानंतर आ. एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट करत भाजपमध्ये जाण्याची आता मला कोणतीही घाई नाही तसेच उत्तर महाराष्ट्रात विजयासाठी श्रम घेणारे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन कुठे गेले? असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांना आ. एकनाथ खडसे यांनी टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या आधी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, त्यांच्या भाजप प्रवेशावर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचाराची धुरा आ. खडसे यांनी सांभाळली आणि विजय देखील मताधिक्क्याने खेचून आणला. रावेर लोकसभ मतदारसंघाच्या संदर्भात भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल होती. त्यानंतर जळगाव आणि रावेन या दोन्ही जागा आम्ही जिंकल्य आहेत. माझ्या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे- या ठिकाणी आधीच भाजपर्च ताकद होती, त्यानंतर आमर्च देखील ताकद झाली, असेह आ. खडसे यांनी स्पष्ट केले मागील निवडणुकीत भाजपचे २० खासदार निवडून आले होते, परंतु यावेळेस त्यांना कमी मतदान झाले आहे. त्याचा फटका राज्यातील महायुतीला बसला. केंद्रात देखील नरेंद्र मोदी यांना बसला आहे. यातच अलीकडच्या काळातील राज्यातील राजकीय वातावरण पाहिले तर ते लोकांना आवडलेले दिसून आले नाही, असेही एकनाथ खडसे म्हणाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकप्रकारे ह टोला लगावला.





















