जळगाव मिरर | ३१ जुलै २०२४
जळगाव शहरातील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात नेहरू नगरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी २९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता पिडीत मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळवून नेले. ही घटना नातवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.