जळगाव मिरर | १० नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, मुलीचा शोध घेऊनही ती मिळाली नाही, त्यामुळे बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता ही मुलगी दुकानावर दूध घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले.