जळगाव मिरर | २४ जुलै २०२३
पाचोरा तालुक्यातील एका गावातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कुठले तरी आमिष दाखवून तिला फुल लावून पळून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलगी २२ जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला कुठले तरी आम्ही दाखवून फुल लावून पळून नेल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दिल्यावरून आरोपी विरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक शैलेश चव्हाण करीत आहे.