जळगाव मिरर | ८ मे २०२४
दोघ मुलांसह भाच्याला घेवून घराकडे निघालेल्या आशासेविकेच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरात या अपघातात दुचाकीस्वार वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०) या महिलेसह सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहम सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) यादोघ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास शिरसोली ते रामदेववाडी दरम्यान घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धडक देणाऱ्या कारसह अन्य एका कारची तोडफोड केली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक सुमारे चार तास ठप्प झाली होती.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी जळके येथील आशासेविकास वत्सला व उर्फ राणी चव्हाण या पती व दोन मुलांसह वासतव्यास होत्या. रामदेववाडी येथे त्यांचे माहेर असल्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास त्या माहेरी गेल्या होत्या. दुपारी पाच वाजेच्या सुमारास त्या दोघ मुलांसह भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांना घेवून शिरसोली येथे घरी येण्यासाठी निघाल्या. गावापासून काही अंतरावर जाताच समोरुन भरधाव वेगाने पाचोऱ्याकडे जात असलेल्या (एमएच १९ सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार महिला ही तिघ मुलांना घेवून रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली, तर कार थेट बाजूला असलेल्या तारेचे कुंपण तोडून खडकावर आदळली होती.
या अपघातात दुचाकीस्वार वत्सला उर्फ राणी चव्हाण यांच्यासह त्यांचा दोन वर्षाचा सोमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोठा मुलगा सोहम व भाचा लक्ष्मण राठोड हे दोघ गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर सोहम याचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला तर लक्ष्मण राठोड याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
धडक देणाऱ्या तरुणांना जमावाकडून मारहाण होत असल्याने त्यांना घेवून जाण्यासाठी (एमएच १९, सीजे ११७७) क्रमांकाची कार त्याठिकाणी आली. दोघे तरुण त्यामध्ये बसताच संतप्त झालेल्या जमावाने या वाहनात वृद्ध देखील बसले होते, जमावाने त्यावृद्धांना बाहेर काढीत कारची तोडफोड करीत चुराडा करुन टाकला होता.