जळगाव मिरर | १४ जून २०२३
राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नुकतीच १३ रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती त्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा फोटो नसल्याने विरोधकांनी शिंदे व भाजपात फुट पडत असल्याची माहिती दिली होती. पण शिंदे सरकारने लागलीच दुसऱ्या दिवशी नवीन जाहिरात प्रकाशित केल्याने आता चर्चेला जरी पूर्णविराम आला असला तरी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी ट्विट करून शिंदे गटाला टोला लगाविला आह.
आ.रोहित पवार म्हणाले कि, इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाला लगावला आहे.
शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. ‘देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी ही जाहिरात होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी फडणवीसांना या जाहिरातीत स्थानच दिले नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यात फडणवीसांनी कानदुखीचे कारण देत एकनाथ शिंदेंसोबत कोल्हापूरला जाणेही टाळले होते. त्यामुळे या जाहिरातीमुळे देवेंद्र फडणवीस कमालीचे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरच रोहित पवारांनी आज ट्विट करून खोचक टोले लगावले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, इजा ‘कानाला’ झालेली नव्हती तर ‘मनाला’ झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. रोहित पवार म्हणाले की, शिंदे सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळेच राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार म्हणाले, शिंदे गटाचे सरकार आल्यामुळे त्यांच्या काही नेत्यांना पदे मिळाली. पण, सामान्य नागरिक मात्र अडचणीत आला आहे. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत आहे. बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचे का?
