
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
धार पाझर तलाव पुनर्भरण करणारी ब्रिटिशकालीन फापोरे येथील पाटचारी दुरुस्त करावी आणि पाटचारीसह पिंपळे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागण्यांसाठी १२ गावच्या शेतकऱ्यांनी प्रांत कचेरीवर १५० बैलगाड्यांचा मोर्चा काढून आवारातच ठेचा भाकरीचे भोजन करत ठिय्या मांडला होता. लेखी आश्वासनांनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
फापोरे येथे बोरी नदीवर ब्रिटिशकालीन फड बंधारा असून नैसर्गिकरीत्या हा बंधारा भरला की पाटचारीतन पाणी वळते होऊन पढे धार पाझर तलाव भरला जात होता. तसेच पिंपळे नाल्यातूनदेखील पाणी वाहून धार तलावात जात होते. यामुळे फापोरे, अमळनेर, नंदगाव, लडगाव, अंतीं रंजाने धार मालपर अंबारे खापरखेडा, तांबेपुरा, सानेनगर, तासखेडा, अमोदे, मुडी, करणखेडे या गावच्या पिण्याचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटला होता. कालांतराने अमळनेर शहरात वस्ती वाढल्याने प्लॉटधारकांनी नाला बुजवून टाकला व पाटचारीवर अतिक्रमण केल्याने पुरेसे पाणी वाहत नाही आणि धार पाझर तलाव भरणे बंद झाले. परिणामी अनेक गावांना टंचाई जाणऊ लागली.
गिरणा पाटबंधारे विभाग, महसूल व नगरपालिका विभाग यांचे दुर्लक्ष झाले. अखेरीस प्रा. गणेश पवार, सचिन पाटील, शिवाजी पाटील, विश्वास पाटील, सचिन वाघ, जितेंद्र पाटील, प्रफुल्ल पवार, राहुल पाटील, गणेश पाटील, किशोर पाटील, शशिकांत पाटील, वसंत पाटील, दिलीप पाटील, योगेश पाटील, प्रदीप पाटील, संभाजी पाटील, भाईदास पाटील, दामोदर खैरनार, सुनील पाटील यांनी २३ रोजी धार मालपूर गावापासून प्रांत कचेरीवर १५० बैलगाड्यांचा मोर्चा आला. दोन बैलगाड्या आवारात घालून शेतकऱ्यांनी तेथेच ठिय्या मांडला.