
जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४
दिनांक १२ जानेवारी रोजी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ साहेब व युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरा व क्रीडा आघाडीच्या वतीने जळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे 12 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान नमो चषक 2024 चे आयोजन करण्यात आले असून आज या नमो चषकच्या स्पर्धे अंतर्गत कबड्डी, क्रिकेट,आट्यापाट्या, वकृत्व स्पर्धा या स्पर्धेचं नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले.
जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व भाजपा जिल्हाध्यक्ष, उज्वला ताई बेंडाळे यांनी स्पर्धकांशी संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले आणि युवा दिनाच्या देखील सर्व युवकांना शुभेच्छा दिल्या तर याप्रसंगी जळगाव विधानसभा निवडणूक प्रमुख विशाल त्रिपाठी, माजी उपमहापौर सुनील खडके, महानगर सरचिटणीस महेश जोशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक भगत भाई बालानी, माजी स्थापन समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, क्रीडा आघाडी अध्यक्ष अरुण श्रीखंडे, राजेंद्र मराठे, राहुल वाघ, अमित काळे, राजू मराठे,सुनील खडके,अॅड. शुचिता हाडा, जयेश भावसार, अजित राणे, सुधा काबरा, दीप्ती चिरमाडे, शक्ती महाजन, बापू कुमावत, ललित बडगुजर, महेश कापुरे, अक्षय जेजुरकर, सचिन बाविस्कर ,रोहित सोनवणे,राहुल मिस्त्री, सागर पोळ, सागर जाधव, दिनेश पुरोहित, गौरव पाटील, जयंत चव्हाण, हर्षल चौधरी रियाज शेख, महेश पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर चे सर्व मा.लोकप्रतिनिधी पदाधिकारी व सर्व युवा मोर्चा पदाधिकारी संयोजक व प्रतिनिधी उपस्थित होते