मेष : बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. तुम्हाला एकाकी वाटेल तेव्हा तुम्ही तुमच्या कुटूंबियांची मदत घ्या. त्यामुळे नैराश्यापासून तुमचा बचाव होईल. परिणामी सुयोग्य, संयुक्तिक निर्णय घेण्यास तुम्हाला मदत होईल. तुमच्या जोडीदाराला सरप्राइझ देत राहा.
वृषभ : आर्थिक चिंता सतावेल. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल. जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.
मिथुन : धन लाभ होण्याची शक्यता. गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. ऑफिसमध्ये तुमचा मूड आशावादी असेल. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला नवे संबंध जोडावे लागतील. तुमच्या करिअर वाटचालीत त्यांचा हमखास उपयोग होईल. आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.
कर्क : अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.
सिंह : धनालाभ होण्याची शक्यता. क्रिएटिव्ह व्यक्तींना आपल्या कामात जोडून घ्या. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील. तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.
कन्या : आर्थिक लाभ होतील. इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाऱ्या समस्या सोडवू शकाल. वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक नुकसान होऊ शकते. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.
वृश्चिक : धनलाभ होईल. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. व्यावसायिक करारांवर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. जोडीदार सुस्वभावी बाजू दाखवेल.
धनु : भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका.
मकर : खर्च वाढतील. तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.
कुंभ : आर्थिक स्थिती सामान्य. विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आज तुमच्या कार्यालयात संधी मिळेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात.
मीन : अति खर्च होईल. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाहीत, तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता. वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.