जळगाव मिरर । १७ नोव्हेंबर २०२५
भुसावळ तालुक्यातील तालुक्यातील विल्हाळे रस्त्यावर डंपर चालकांच्या बेफिकीर वाहनचालकामुळे एक गंभीर अपघात टळला. भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने मोटारसायकलला ओव्हरटेक करताना रस्त्यालगत उभ्या झांडाला जोरदार धडक दिली. सुदैवाने मोटारसायकलस्वार प्रसंगावधानाने बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे कि, विल्हाळे परिसरात दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे अॅश बंड (राखेचे बंड) असल्याने दररोज हजारो डंपर ये-जा करतात. राख भरल्यानंतर हे डंपर वरणगाव शहरातून जात असल्याने वाहतुकीचा ताण वाढतो. मात्र, अनेक चालक नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने वाहन चालवितात. त्यामुळे वरणगाव व परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने या डंपर वाहतुकीवर नियंत्रण आणावे, वेगमर्यादा कठोरपणे लागू करावी तसेच नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. सततच्या धोकादायक वाहतुकीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे





















