
जळगाव मिरर | २१ मे २०२५
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील गॅनीच्या ढाब्याजवळ २० रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चारचाकीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे कि, ताडेपुरा येथील भटू दिलीप पाटील (वय २९) हे आपल्या रिक्षा (एमएच – ४१, एएक्स १३५६) ने लोंढवे येथे पॅसेंजर सोडायला गेले होता. ते लोंढाव्याहून अमळनेर येथे परत येत असताना अमळनेरकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी (एमएच १८, एजे ५५८८) ने रिक्षाला जबर धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक भटू पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, या प्रकरणी चारचाकीचा चालक अविनाश भैय्यासाहेब पाटील (रा. दहिवद) याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करत आहेत. दरम्यान, भटू पाटील यांनी प्रेमविवाह केला असून सध्या त्यांनी नवे घर बांधायला सुरुवात केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे ही निधन झाले होते.