जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२४
मतदान केंद्रावर तोतयेगिरी करुन मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून निवडणूकीत गैरवाजवी प्रभाव पाडणाऱ्या देवेंद्र विष्णू पाटील (वय २४, रा. शिरसोली, प्र. बो, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील शिरसोली प्र. बो. येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरु होती. यावेळी देवेंद्र पाटील या तरुणाने मतदान प्रक्रियेत तोतयेगिरी करुन मोबाईल फोनमध्ये व्हीडीओ काढून निवडणुकीत गैरवाजवी प्रभाव पाडतांना दिसून आला. दरम्यान, मतदान केंद्राध्यक्ष यांनी लोखी रिपोर्ट दिला. त्यानुसार पोलीस कर्मचारी अभिजीत सैंदाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन देवेंद्र विष्णू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे करीत आहे.