जळगाव मिरर | १९ जुलै २०२४
जिल्ह्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच भुसावळ तालुक्यातील विल्हाळे येथील राखेच्या बंडात राख वाहणारे ट्रक्टर उलथून त्या खाली दाबल्या गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार असे, औष्णीक विज केंद्रातून कोळशीची जळालेली राख विल्हाळे बंडात जमा झालेली राख विट भट्टी व इतर कामासाठी वापरली जात असल्याने राखेची मोठ्या प्रमाणात बंडातून टॅक्टर व इतर वाहनाने वाहतूक केली जाते. बंडात जाणारा रस्ता मोठा जिकरीचा असल्याने वाहन चालकाना त्या रस्त्यावर चांगलीच कसरत करुन राखेची वाहतूक करावी लागते.
याच रस्तावर किरकोळ अपघात नित्याचेच झाले आहे. आशा जीवघेण्या रस्त्यावर मध्यप्रदेश येथुन मजुरीसाठी आलेला व सध्या विल्हाळे येथे स्थायीक असलेला विशाल तारसिंग तलोले (भिलाला) हा सुमारे १५ ते १८ वर्षाचा तरुण दि १७ बुधवार रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ट्रक्टर घेऊन राख भरण्यासाठी जात होता. अचानक टॅक्ट्ररसह ट्रॉली उलटल्याने विशाल त्याखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बी एन एन एस १९४ प्रमाणे अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील सह पो निरिक्षक श्रावण जवरे हे करीत आहे.