जळगाव मिरर | १७ मे २०२५
म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा गिरणा नदी पात्रातील डोहात पाय घसरून पडल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील आकाश राजेश यादव (वय २५) हा तरुण दुपारी २ वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळील गिरणा नदी पात्रात असलेल्या डोहात म्हशींना पाणी पाजण्यासाठी गेला होता. दरम्यान आकाश यादव याचा अचानक पाय घसरून आकाश पाण्यात पडला. आकाश यास पोहता येत नसल्याने आकाशचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.
सायंकाळ झाली तरी आकाश घरी न परतल्याने आकाशच्या भावाने शोध घेतला असता आकाश याचा मृतदेह गिरणा नदी पात्रातील डोहात आढळुन आला. आकाश यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत आकाश याच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, एक भाऊ असा परिवार आहे. अत्यंत मेहनती व शांत स्वभाव असलेल्या आकाशचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.





















