जळगाव मिरर | १४ मे २०२४
पती-पत्नी व भावजई घराबाहेर उभे असतांना बाजूला हसीमजाक करणाऱ्या तरुणांना जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका जणाने राकेश गणपत भाट (वय ४५, रा. कंजरवाडा) यांना पाईपने मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवार दि. ११ मे रोजी कंजरवाडा परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कंजरवाडा परिसरात राकेश भाट, त्यांची पत्नी सोनीबाई, भावजयी सपना नरेश भाट हे घराबाहेर उभे होते. यावेळी त्याच परिसरात राहणारे त्यांचे पुतणे व अन्य असे तिघे हसीमजाक करत होते. त्या विषयी त्यांना राकेश यांनी विचारणा केली असता शिवीगाळ केली. तसेच राकेश यांच्या कपाळावर लोखंडी पाईप मारला. त्या ठिकाणी राजेश भाट, नरेश भाट, पुतण्या आतीष भाट हे भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांच्यासह सोनीबाई यांना मारहाण केली. या प्रकरणी राकेश भाट यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहेत.