जळगाव मिरर | १८ ऑगस्ट २०२४
धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने आर्यकिर्ती उर्फ बबलू चंद्रकांत सोनवणे (वय २६ रा. श्याम नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी गिरणा पंपिग रस्त्यानजीकच्या रेल्वे रुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाघ नगर परिसरातील श्याम नगरातील रहिवासी असलेला आर्यकिर्ती सोनवणे हा तरुण एका कापड दुकानात कामाला होता. शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तो ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.