जळगाव मिरर / १० फेब्रुवारी २०२३
यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ झालेल्या दुचाकी व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घड़ली. यातील जखमी व्यक्तिस उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, अमोल राजेन्द्र पाटील, वय २६ वर्ष, राहणार सावखेडा सिम, ह .मु.जळगाव व ईस्माइल हबीब तडवी, वय ३० वर्ष, राहणार सावखेडा सिम तालुका यावल हे दोघ दिनांक १० फेबूवारी शुक्रवारी रोजी दुचाकी क्रमांक १९ डी बी २७४६ ने किनगावकडे जात होते. दरम्यान सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमागस किमगावकडुन सुसाट वेगाने येणाऱ्या एका अज्ञात डंपरने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात अमोल राजेन्द्र पाटील या तरूणाचा जागीच मृत्यु झाला तर ईस्माईल हबीब तडवी हा तरूण गंभीर झाला आहे. या दोघांना घटनास्थळा वरून तात्काळ जळगाव येथे पाठविण्यात आले आहे.