जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून आम आदमी पार्टी पक्षाचा प्रचार प्रसार व सामाजिक आंदोलने करून जनतेचे लक्ष वेधून घेत आहे. तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी ॲक्शनमोडवर येत पदाधिकारी नियुक्ती केली असून आगामी काळात आम आदमी पार्टीकडे जनता मोठ्या अपेक्षेने बघत आहे.
महाराष्ट्र राज्य आम आदमी पार्टीचे सहप्रभारी गोपाल ईटालिया यांच्या आदेशानुसार जळगाव अजिंठा विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य सचिव संघटक नविंदरसिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाअध्यक्ष व जळगाव शहर महानगर अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या वेळेस जळगाव जिल्हा अध्यक्षपदी मिलिंद अशोक चौधरी यांची जाहीर नियुक्ती करण्यात आली. तर जळगाव शहर महानगर अध्यक्षपदी अमृता नेटकर यांची नियुक्ती करण्यात आली.या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.जळगाव जिल्ह्यातील हंगामी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.व संघटन वाढीसाठी विविध उपक्रमातून संघटन कशी वाढवता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा करुन बैठक संपन्न करण्यात आली.