अमळनेर : विक्की उत्तम जाधव
तालुक्यातील अंतुर्ली- रंजाणे गावाजवळ मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने अपघात झाला. यात दोघांना दुखापत झाली असून, एकाविरुद्ध मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास बाबूलाल पाटील (हिंगोणे, ता. अमळनेर) व भिकन पिंजारी हे मोटारसायकलने अमळनेरकडून हिंगोणे येथे जात असताना अंतुर्ली गावाजवळ आरोपी जयेश बाळू पाटील (अंतुर्ली, ता. अमळनेर) याने भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात विलास पाटील व भिकन पिंजारी यांना दुखापत झाली असून, जयेश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहेत.