
जळगाव मिरर | २१ जुलै २०२३
पाचोरा तालुक्यातील शाहपुरा (लोंढिपुरा) गावी १८ जुलै रोजी लोहारा दुरक्षेत्र अंतर्गत गणेश रुपचंद परदेशी रा. शहापुरा ता. पाचोरा यांच्या घरातील कडी खोलून अज्ञात-चोट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून त्यांच्या लोखंडी पेटीचा कोंडा उचकटून त्यातील ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आठ भार वजनाचे चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपये रोख असा ऐवज चोरून नेलेबाबत पोलीस ठाणे पिंपळगाव हरेश्वर येथे भादवी ४५४/३८० अन्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी व पोलीस यांनी संशयीतास ताब्यात घेतले. त्यास खाकी वर्दीचा इंगा दाखवतात चोरीची कबुली दिली होती. आरोपी नामे दीपक सुनील खरे यास अटक करून पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे.
सदर आरोपीकडे चौकशी केली आरोपीताने ४६ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ भार चांदीचे दागिने व रोख ११, ७०० रुपये असा एकूण २, ३९, ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल असा पोलिसांना काढून दिला. तसेच उर्वरित मुद्देमालाबाबत आरोपिताकडे अधिक चौकशी तपास अधिकारी करत आहेत. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक एस.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पो. उपनिरीक्षक अमोल पवार सोबत पोलीस कर्मचारी हे करीत आहे.





















