जळगाव मिरर / ८ फेब्रुवारी २०२३ ।
जळगाव शहरातील टॉवर चौक ते चित्रा चौक रस्त्यावर दि ७ रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डम्परवर शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यात डम्परमध्ये तीन ब्रास वाळू सापडली. पोलिसांनी वाळूसह डम्पर पोलिस ठाण्यात जमा केला.
या प्रकरणी चालक सूर्यभान भागवत भोई (२४, रा. साकेगाव, ता. भुसावळ), विठ्ठल भागवत पाटील (३५, रा. अयोध्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डम्परसह वाळू असा ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोहेकॉ. रवींद्र सोनार करीत आहेत.
