जळगाव मिरर | १० जुलै २०२५
जळगाव जिल्हा पोलीस दलाने शाळकरी व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या सुरक्षतेसाठी ठोस पाऊले उचलली आहे. त्या करीता प्रत्येक पोलीस ठाण्यात दामिनी पथक तयार करण्यात आले असून त्या पथकाकडून त्यांचया हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालयाच्या वेळेस गस्त घातली जात आहे. या पथकाने पहिल्याच दिवशी २१ तरुणांप्रतिबंधात्मक कारवाई करुन २५ जणांना समज देवून सोडून दिले.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थीनीची छेड काढत असल्याच्या घटना वाढत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सर्वच प्रभारी अधिकाऱ्यांना टवाळखोरांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महिला सुरक्षेकरीता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन पुरुष व एक महिला अंमलदाराची अशा एकूण १२ पुरुष तर ६ महिला अंमदारांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक आपल्या हद्दीत असलेल्या शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गस्त घातली जात असून याठिकाणी टवाळखोरीसह छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे पालकांसह विद्यार्थीनींमध्ये एक सकारात्मक आणि सुरक्षतेची भावना निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
शहरातील सेंट जोसेफ हायस्कुल समोर स्वर्गीय मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये टवाळखोरांवर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. याठिकाणाहून १४ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान पाटील, राहूल पाटील, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात फिरणाऱ्या पाच टवाळखोरांवर कारवाई केली. यावेळी त्यांच्याकडून त्या परिसरात फिरणाऱ्यांचे ओळखपत्र व कागदपात्रांची तपासणी केली जात होती
बुधवारी या दामिनी पथकाने मेहरुण तलाव परिसरात असलेल्या सेंट टेरेसा स्कुल, नूतन मराठा महाविद्यालय, एम. जे. कॉलेज, बेंडाळे कॉलेज, का. ऊ. कोल्हे विद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय याठिकाणी विनाकारण शाळेच्या बाहेर थांबून विद्यार्थीनींना बघून अश्लिल चाळे करणाऱ्या २१ टवाळखोरांवर पथकाकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर २५ जणांना समज देवून सोडून देण्यात आले.
कारवाई करण्यात आलेल्या टवाळखोरांना पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. यावेळी पोलिसांनी टवाळखोरांच्या मुलांसह त्यांच्या पालकांना समज देवून त्यांना सोडून दिले. तसेच या कारवाईची मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
