जळगाव मिरर / २३ एप्रिल २०२३ ।
जिल्ह्यातील पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. यामुळे जिल्ह्यात दोन दिवसापासून ठाकरे गट व शिंदे गटात आरोपाच्या फैरी होत होत्या. तर आज शिंदे गटाचे पदाधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे पाचोऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्तहि लावण्यात आला आहे.
दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान दिले होते. कि, पाचोऱ्याच्या सभेत तुम्ही घुसून दाखवा त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिले असून आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे, पवन सोनवणे, जितेंद्र गवळी, गणेश सोनवणे, कुंदन काळे, सोहम विसपुते, नवनाथ दारकुंडे, श्याम कोगटा, मनोज पोकळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते चारचाकी वाहनातून शिवसैनिक पाचोऱ्याच्या दिशेला निघाले आहे.