जळगाव मिरर | ३१ मे २०२३
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस माल्या अर्पण पण करून प्रतिमा पूजन केले त्याच बरोबर सर्व पदाधिकाऱ्यांनी पुष्पवंदना अर्पण केली याप्रसंगी श्रीमती नीता वानखेडकर यांनी अहिल्याबाईंच्या जीवनावर प्रकाश झोत टाकला.
अहिल्याबाई एक थोर समाजसुधारक होत्या त्यांनी समाजासाठी जे उद्बोधन आणि कार्य केले ते अतिशय महत्त्वपूर्ण असे होते समाजाच्या उद्धारासाठी आणि विकासासाठी त्या कमी वयातच आलेला संसार आणि रयतेची जबाबदारी आणि एक संस्थानिक म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आजच्या नारीसमोर एक आदर्श निर्माण केला त्या आदर्शला समोर ठेवून नारीशक्तीच्या सर्व महिला जीवनाची वाटचाल करतील त्याचप्रमाणे नारीशक्तीच्या वतीने सर्व महिलांना आवाहन करण्यात येते की अहिल्याबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल करावी याप्रसंगीसौ मनिषा पाटील, नेहा जगताप ,किमया पाटील, राधिका पाटील, शरयू पाटील ,माधुरी शिंपी, नीता वानखेडकर, वंदना मंडावरे ,मीनाक्षी शेजवळ, भाग्यश्री महाजन, हर्षाली तिवारी उपस्थित होत्या