जळगाव मिरर | २ जुलै २०२५
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखान्यावर अमळनेर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून ९ पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच कुंटणखाना चालविणाऱ्या ३ महिलांसह सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गांधलीपुरा भागात कुंटणखाना सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दि.१ जुलै रोजी वेगवेगळ्या घरांमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर दुपारच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत ९ पीडीत महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्या महिलांसह ग्राहक म्हणून गेलेले सात जणांना अटक करण्यात आली. तसेच कुंटणखाना चालवणारी एक महिला पसार झाली आहे.
कुंटखान्यावर कारवाई केल्यानंतर कुंटणखाना चालवणाऱ्या महिलांना अटक करण्यासाठी अमळनेर पोलिसांकडून रात्री न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्याच्यावर कामकाज झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, गणेश पाटील, प्रदिप खैरनार, कैलास शिंदे, मिलींद सोनार, विनोद भोई, विनोद सोनवणे, सिध्दांत शिसोदे, मंगल भोई, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद संदाशिव, प्रशांत पाटील, नितीन कापडणे, मयुर पाटील, निलेश मोरे, राहुल पाटील, राहुल पाटील, उज्वलकुमार म्हस्के, भुषण परदेशी, राहुल चव्हाण, नरेश बडगुजर, संजय सोनवणे, वाल्मीक पाटील, गणेश पाटील, उदय बोरसे, शामल पारधी, वैष्णवी पाटील, होमगार्ड निलीमा पाटील, ममता ठाकरे, मनिषा वारुळे, निलीमा पाटील यांच्या पथकाने केली.
