जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२४
राज्यात कुठेही संकट आले कि ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी पोहचत असतात मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदार संघात संकट होते. त्यातील एक मतदार संघ म्हणजे रावेर विधानसभा मतदार संघात यंदा संकटमोचकांनी रणनिती आखत भाजपचे उमेदवार अमोल जावळे यांनी अखेर बाजी मारली आहे.
जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघापैकी काही मतदार संघात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र होते. त्यातील रावेर विधानसभा मतदार संघ नेहमीच कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या मतदार संघात काही हि करून भाजपचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी रणनिती आखली यामध्ये आरोग्यदूत म्हणून ख्याती असलेले अरविंद देशमुख यांना या मतदार संघाची जबाबदारी दिली अरविंद देशमुख यांनी तब्बल ४२ दिवस यावल, रावेर तालुक्यात मुक्कामी थांबून रणनीती आखून व संघटनच्या बळावर हा ऐतीहासिक विजय खेचण्यास भाजपाला यश आले आहे. या मतदार संघात विजय चाणक्यनितीने झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदार संघात भाजपाच्या विजयाचे खरे चाणाक्य ठरले ते आरोग्यदूत अरविंद देशमुख हे मात्र खरे
अमोल जावळे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जळगावहून अरविंद देशमुख हे मुक्कामी रावेरला गेले. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील रावेरची जबाबदारी अरविंद देशमुख यांच्यावर सोपविली. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात भाजपाचा चाणक्य यशस्वी ठरला असे बोलले जात आहे. मतदार संघातील अनेकांना सोबत घेवून अमोल पर्वाचा उदय करण्यास अरविंद देशमुख हे यशस्वी ठरले आहे.