अमळनेर : विक्की उत्तम जाधव
विहिरीच्या स्टार्टरजवळ जाऊन विजेचा शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता घडली.
गोरेलाल धनसिंग देवरे (रा. सेंधवा) हे जवखेडा येथे गुलाबराव पाटील यांच्या शेतात कामाला आहेत. त्यांचा मुलगा अंकित गोरेलाल देवरे (८) याचा विहिरीच्या मोटरच्या स्टार्टरला हात लागला. त्याला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी मांडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथे डॉक्टर नसल्याने अंकितला पुन्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अमळनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे तपास करीत आहेत.