जळगाव मिरर / ५ फेब्रुवारी २०२३
जळगाव शहरात महाशिवरात्री उत्सव विविध मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. त्याचप्रमाणे महाबळ परिसरातही हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शहरातील महाबळ परिसरातील नागेश्वर कॉलनी येथील श्री स्वयंभु नागेश्वर महादेव मंदिरात दि.18 फेबु्रवारी शनिवार रोजी शिव-रुद्राभिषेक पूजन व दर्शन तर सायंकाळी 6 ते 10 वाजे दरम्यान ‘एक शाम शिव के नाम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रख्यात गायिका अनामिका मेहरा यांच्या सुमधूर आवाजात भव्य संगीतमय भजनाचा कार्यक्रम होणार आहे. भजनाचा आनंद घेण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वयंभु नागेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापक व समस्त स्वयंसेवी शिवभक्त तसेच आंबेकर परिवार यांच्यातार्फे करण्यात आले आहे.