मेष : सकारात्मक राहण्यासाठी आज धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात वेळ व्यतित करा. तुम्ही घरगुती देखभालीच्या कामातही व्यस्त राहाल. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. कोणतीही अशुभ सूचनेमुळे मनात तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायिक कामे सामान्य राहतील.
वृषभ : आज सकारात्मक कृती करणाऱ्या व्यक्तीसोबत विचारांची देवाणघेवाण झाल्याने तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल. भविष्यात उत्पन्नाचे साधनाची हमी मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या तब्येतीची चिंता असेल; पण सर्व काही ठीक होईल. कोणाशीही वाद घालू नका. व्यवसायाशी निगडीत कामात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल.
मिथुन : विद्यार्थी आणि तरुणांनी करिअरकडे लक्ष द्यावे. मालमत्तेसंबंधी वाद मिटविला जाईल. अनावश्यक खर्चात कपात करा, अन्यथा तुमचे आर्थिक बजेट कोलमडेल. आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी थोडा वेळ द्या. घरातील वातावरण आनंददायी आणि शिस्तबद्ध ठेवा. आरोग्य चांगले राहिल.
कर्क : आळस आणि निराशेपासून दूर राहा. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे श्रीगणेश सांगतात. कोणीतरी तुमच्या उदारतेचा फायदा घेऊ शकते. घर, गाडी आदींशी संबंधित कागदपत्रे जवळ ठेवा, ॲसिडीटी आणि गॅसची समस्या जाणवेल. .
सिंह : आज तुम्ही प्रतिकूल परिस्थिती संयमाने हाताळाल. स्वतःला रचनात्मक कार्यात गुंतवून ठेवाल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. व्यवसायातील आव्हानात्मक कामाचा पुन्हा विचार करावा लागेल. अहंकारामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढू शकतात. आरोग्य चांगले राहिल.
कन्या : आज कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाचे पालन करा. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित योग्य दिशा मिळेल; पण तथ्य जाणून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. मानसिक शांतता अनुभवण्यासाठी कोणत्याही धार्मिक कार्याची किंवा ध्यानाची मदत घेणे देखील योग्य ठरेल. काम जास्त असले तुम्ही घरीच राहाल आणि कुटुंबासोबत वेळ घालवाल. वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तूळ : आज रखडलेल्या कामांना गती मिळेल, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुम्हाला मनशांती मिळेल. कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. आशा गमावल्याने मन उदास होऊ शकते. पती-पत्नी एकमेकांशी योग्य सामंजस्य राखतील. पोटाशी संबंधित काही समस्या असू शकतात.
वृश्चिक : तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. घरातील ज्येष्ठांचा स्नेह आणि आशीर्वाद असेल. काळ थोडा प्रतिकूल आहे. प्रेमसंबंधांना कौटुंबिक मान्यता मिळाल्याने मन प्रसन्न राहू शकते. आरोग्य चांगले राहील.
धनु : आज आयुष्याची गाडी थोडी रुळावर जाईल. आर्थिक बाबतीत तुम्ही योग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. अति मेहनत घ्यावी लागेल; पण त्याचबरोबर यशही मिळेल. बेकायदशीर कृत्यात सहभागी असणार्यांपासून अलिप्त राहा. कुटुंबासोबत आनंदातवेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.
मकर : खूप दिवसांनी एखादी चांगली बातमी मिळाल्याने आज मन अधिक प्रसन्न होईल, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाची समस्या सोडवण्यातही तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकता. अतिआत्मविश्वास टाळा. व्यवहारात लवचिकता आणणे आवश्यक आहे. व्यवसायाशी संबंधित कामांना अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असेल. घरात आणि कुटुंबात तुमची उपस्थिती सर्वांना आनंद देऊ शकते. कोणताही जुना आजार त्रासदायक ठरु शकतो.
कुंभ : कोणतेही कौटुंबिक मतभेद चर्चा करून सोडवाल. तुमच्या कामांचे कौतुकही होईल आणि लोकप्रियतेचा आलेखही वाढेल. भावनिकदृष्ट्या तुम्हाला मजबूत आणि उत्साही वाटेल. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही तुमचे नियंत्रण ठेवा. व्यवसायात कोणताही ठोस निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा लागेल. कुटुंबातील सदस्यांसह चर्चा करुनच महत्त्वाचा निर्णय घ्या. वाईट संगत टाळा.
मीन : आज तुम्ही कामाच्या व्यस्ततेतून कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत थोडा वेळ व्यतित कराल. भावनेऐवजी तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य वापरा. तरुणांनाही त्यांच्या कार्यात यश मिळवण्यासाठी प्रतिष्ठित व्यक्तीची मदत मिळू शकते. मानसिक शांततेसाठी ध्यान करा. घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. पती-पत्नीमध्ये काही वाद होण्याची शक्यता आहे.