जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
जून्या भांडणाच्या कारणावरुन बहिण भावाशी वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यानंतर दोघांवर धारदार चॉपरने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रायपूर कुसंबा परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील अजय सुरेश सोनवणे हे वास्तव्यास असून ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांचे कुसुंबा येथील करन चंद्रशेखर पाटील व चेतन वसंत माळी यांच्यासोबत वाद झाला होता. याच भांडणाच्या कारणावरुन दि. २६ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अजय सोनवणे व करन व चेतन माळी यांच्यासोबत वाद झाला. या भांडणातून दोघांनी अजय सोनवणे यांच्या घरात प्रवेश करुन त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यानंतर अजय सोनवणे व सपना कैलास पवार या दोघ बहिण भावंडावर धारदार चॉपरने वार करीत गंभीर जखमी केले. दोघांवर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन करन चंद्रशेखर पाटील व चेतन वसंत माळी रा. कुसुंबा या दोघांविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहे.