जळगाव मिरर | ३१ मे २०२५
जुन्या भांडणाच्या कारणावरून शेख फिरोज शेख सलीम (३३, रा. नशिराबाद) या चालकाला टोळक्याने बेदम मारहाण केली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली. ही घटना बुधवारी (२८ मे) नशिराबाद बसस्थानकाजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शेख फिरोज शेख सलीम यांच्याशी गावातील काही जणांचा वाद आहे. ते बसस्थानकाजवळ असताना टोळक्याने लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यासह बांबुने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख फिरोज शेख सलीम यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून १८ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि ए.सी. मनोरे करीत आहेत.




















