जळगाव मिरर | ९ जुलै २०२५
जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर (वय २५) याला सोमवारी दुपारी तुकारामवाडी परिसरात सूरा घेवून दहशत माजवितांना जेरबंद केले. त्याच्याविरुद्ध कुठलीही परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तो वावरत असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील तुकाराम वाडी परिसरातील पवन उर्फ बदया दिलीप बावीस्कर याला दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार असतांना पवन बावीस्कर कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश करून तुकारामवाडी परिसरात सुरा घेवून दहशत माजवित असल्याची एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलीसांच्या पथकाने तुकारामवाडी येथील दत्त मंदिराच्या गल्लीतून संशयित पवन उर्फ बद्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरा जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
