जळगाव मिरर | ५ जानेवारी २०२४
देशातील जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दि.४ जानेवारी गुरुवार रोजी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल असून हा गोळीबार सलग २ दिवसांपासून सुरु असून दहशतवाद्यांचा शोध घेत असताना गावात प्रवेश करताच लष्करावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील ही चकमक अजून सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात ही चकमक अद्यापही सुरु आहे. अदिगाम गाव येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफ आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेत काल गावाला घेराव घालण्यात आला. यावेळी दहशतवादी आणि लष्करात मोठी चकमच झाली.
लष्कर आधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिम सुरू असताना लष्कर पथक गावात दाखल होताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांसह सीआरपीएफ देखील घटनास्थळी उपस्थित होते. आजही दहशतवादी आणि लष्करातली चकमक सुरुच आहे. मंगळवारीच गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्व डाव हाणून पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या.