जळगाव मिरर | १ नोव्हेंबर २०२५
शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी जनआक्रोश मोर्चा चे आयोजन सौ.दीपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी किनोद तालुका जळगांव येथे दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी आज सकाळी ९ वाजता करण्यात आले.
या मध्ये प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकरी यांच्या शेत मालाला २ ते ३ रुपये किलो दरात जात आहे,म्हणून या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन केळी चा भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच जिल्हा नियोजन समितीच्या निधी मध्ये शेतकऱ्यांसाठी १० टक्के निधी राखीव ठेवावा व दलालांकडून केळी उत्पादक शेतकरी यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रा.भाऊसाहेब सोनावणे यांनी दिला.
या आंदोलनामध्ये शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे,मनसेचे प्रदीप पाटील,किरण सोनवणे,सुनील सोनवणे,शैलेश चौधरी,शेतकरी नेते राजुदादा नवाल,भाऊसाहेब पाटील,शांताराम बापू पाटील,गोपाल पाटील,अशोक पाटील,प्रभाकर कोळी,लोटन सोनवणे,धनराज वारडे,सुकदेव बाविस्कर,किनोद चे भैय्या दादा पाटील,भगवान धनगर,विजू सपकाळे,अनिल सपकाळे,जगन्नाथ पाटील,योगेश पाटील,नितीन पाटील तसेच भोकर,भादली खुर्द,कठोरा,फूपनी,नांद्रा बुद्रुक,फेसर्डी,नंदगाव,देवगाव,गाढोदा, जामोद,पळसोद,कानळदा,पिलखेडा,करंज,धानोरा,सावखेडा व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.



















