
जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२६
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील राहत्या घरामध्ये गळफास घेऊन कृष्णा वसंत रेणुके (वय ३६) यांनी आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दि. १३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील चटई कंपनीमध्ये कामाला असलेले कृष्णा रेणुके यांनी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेतला. त्यानंतर सोमवारी त्यांच्या आई घरात गेल्या त्या वेळी त्यांना मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.





















