अनेक लोकांना लग्नात नाचणे खूप आवडत असते पण सध्या कोण कधी नाचेल हे कुणीही सांगू शकत नाही. सोशल मीडियावर तर अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. ज्यात तरुण तरुणी एकटेच नाचत असल्याचे दिसत असते, अशीच एक घटना मुंबईच्या रेल्वे स्थानकावर घडली आहे व याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल देखील झाला आहे.
मुंबईच्या रेल्वे स्थानकावर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. आजवर बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला असेल. मात्र, रेल्वे स्टेशनवर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून काही जण नाचण्याचं कौतुक करत आहे. तर काही जण या तरुणीला ट्रोल करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी रेल्वे स्टेशनवर उभी होती. ती अचानक नाचायला सुरुवात करते. तिचा अजब डान्स पाहून बाजूने जाणारा एका काका देखील दचकला. तरुणीचा डान्स नेटकऱ्यांनाही काही पचनी पडला नाही. तरुणीचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. सीमा कनोजिया असं नाव असलेल्या या तरुणीने तिचा हा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केला आहे. तर दोन हजारांहून अधिक जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.