• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एचडीएफसी बँकेवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; सायरन व पोलिसांच्या तत्परतेने मोठी चोरी टळली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२६ 

तरसोद फाट्यावरील एचडीएफसी बँक शाखेत मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी मागील भिंत फोडून प्रवेश करत तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बँकेचा सुरक्षा सायरन वाजताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दिल्ली येथील कमांड सेंटरची सतर्कता आणि नशिराबाद पोलिसांचा तातडीचा प्रतिसाद यामुळे लाखो रुपयांची संभाव्य चोरी टळली. ही घटना २० जुलैच्या मध्यरात्री घडली असून, याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी रात्री १२:५९ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तिजोरीपर्यंत पोहोचून ती फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. याचवेळी बँकेची अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आणि सायरन जोरात वाजू लागला. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न अर्धवट सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. फुटेज दिल्ली येथील कमांड सेंटरमध्ये दिसताच तेथील अधिकाऱ्यांनी तत्काळ बँकेचे व्यवस्थापक वाजीद अली सैय्यद (वय ४५) यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर सैय्यद यांनी त्वरित नशिराबाद पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बँकेचे व्यवस्थापक वाजीद अली सैय्यद तसेच विभागप्रमुख आकाश जैन यांनीही बँकेत धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. प्राथमिक तपासात चोरट्यांनी तिजोरी उघडण्यात अपयश आल्याने कोणतीही रोकड चोरीस गेली नसल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत दिल्ली कमांड सेंटरची सतर्कता, बँकेची सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचा तात्काळ प्रतिसाद यामुळे मोठा आर्थिक अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत आहे.

याप्रकरणी बँक व्यवस्थापक वाजीद अली सैय्यद यांच्या फिर्यादीवरून २१ जुलै रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे या प्रकरणाचा तपास करीत असून, परिसरातील तसेच महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !
जळगाव

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !
जळगाव ग्रामीण

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group