• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 12, 2026
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
केळी विकली, पण पैसे कुठे? शेतकऱ्यांचा आक्रोश; व्यापाऱ्यांकडून थकीत पेमेंटचा गंभीर प्रश्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६ 

जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. केळी पिकाची लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. खते, औषधे, मजुरी, सिंचन, मशागत तसेच पिकाच्या संगोपनासाठी होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक शेतकरी हा खर्च भागविण्यासाठी हातउसने पैसे घेतात किंवा कर्जाचा आधार घेतात. मात्र, उत्पादन तयार झाल्यानंतर माल विक्री करूनही त्याचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे. याबाबत  मनसे शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव – ( रावेर लोकसभा ) अमोल बन्सीलाल पाटील यांनी निवेदन दिले आहे.

केळीचे पीक बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर व्यापारी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात. मात्र, काही प्रकरणांमध्ये माल खरेदी केल्यानंतर पेमेंट देण्यास टाळाटाळ केली जाते किंवा पैसे अनेक दिवस प्रलंबित ठेवले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे उत्पादनासाठी घेतलेले कर्ज, हातउसने पैसे, मजुरी तसेच अन्य देणी फेडताना शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी होत आहे.

केळी पिकासाठी शेतकऱ्याला सुरुवातीपासूनच मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागते. लागवड, खते, कीटकनाशके, पाणी, वीज, मजुरी आणि काढणीपर्यंतचा खर्च केल्यानंतर माल बाजारात जातो. अशा परिस्थितीत माल विकल्यानंतर त्याचे पेमेंट तातडीने मिळणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, पेमेंट रखडल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामाची तयारी करणेही कठीण होते. कर्जाचे हप्ते, मजुरांचे पैसे आणि इतर खर्च भागविण्यासाठी पुन्हा कर्ज किंवा हातउसने पैशांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या दुष्टचक्रात अडकत असल्याची स्थिती आहे.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना मालाचा योग्य आणि पारदर्शक मोबदला वेळेत मिळावा, यासाठी प्रभावी शासकीय यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर त्याचे पेमेंट तात्काळ बँक खात्यावर करण्याची व्यवस्था करण्यात यावी. पेमेंट प्रलंबित ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी आहे. तसेच केळी खरेदी-विक्री व्यवहारात शेतकऱ्यांना मालाची पावती आणि पेमेंटची स्पष्ट नोंद देणे बंधनकारक करावे. व्यापाऱ्यांकडून थकीत असलेली रक्कम मिळवून देण्यासाठी विशेष तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केळी उत्पादक शेतकरी हा केवळ बाजारात माल विकणारा व्यक्ती नसून आपल्या कष्टातून बाजारपेठेला उत्पादन उपलब्ध करून देणारा अन्नदाता आहे. शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेल्या मालाचे पैसे मिळविण्यासाठी त्याला व्यापाऱ्यांच्या मागे फिरावे लागणे ही दुर्दैवी बाब असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

केळीला योग्य व पारदर्शक बाजारभाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी संभाव्य आर्थिक पिळवणूक थांबावी आणि थकीत पेमेंट तातडीने मिळावे, यासाठी शासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तसेच पेमेंटमध्ये जाणीवपूर्वक विलंब करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या व्यापार परवान्याची तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा वेळेत मिळणे हा त्यांच्या आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे केळी उत्पादकांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Posts

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group