• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
Share on FacebookShare on Twitter
जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२६
अमळनेर येथे  अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागराचा रथ आज बुधवार, दि. 15 एप्रिल रोजी सकाळी 8.15 वाजता तालुक्यातील कन्हेरे येथे पोहोचला. त्यानंतर सकाळी 8.15 वाजता चिंचदेवी मंदिरातील सभा मंडपात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या बहुमोल सहकार्यातून कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत अरुण नेरकर यांच्या शुभ हस्ते विधिवतरीत्या भूमीमातेचे पूजन तसेच सेंद्रिय शेतीबद्दलचा जागर करण्यात आला. याप्रसंगी कन्हेरे गाव व मंडळ परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या गावांतील शेतांमधून आणलेल्या मातीचा भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणात पूजनाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी प्रफुल्ल पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी राजेश प्रकाश बोरसे, उप कृषी अधिकारी दिनेश पाटील, ‌‘आत्मा‌’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, अकाऊंट मॅनेजर मनोहर तायडे यांच्यासह श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, गणेश जोशी तसेच सेवेकरी राजेंद्र पाटील, उज्ज्वल अहिरराव, दीपक पाटील, शुभम शिसोदे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.
सुरूवातीला व्यासपाठीवरील मुख्य अतिथी तथा लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत  नेरकर यांच्यासह सर्व मान्यवरांचा मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेरच्या वतीने सुबोध पाटील यांनी श्री मंगळग्रह देवाची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान केला. तसेच सुबोध पाटील यांनी भूमी सुपोषण चळवळीची पार्श्वभूमी सविस्तरपणे उपस्थितांना समजावून सांगितली. त्यानंतर मंदिराच्या पुरोहितांकडून मंडळातील विविध गावांतून संकलित केलेली एक मूठ माती एका ठिकाणी एकत्रित करून तिचे विधिवतरीत्या पूजन करण्यात आले.
कृषी विभागाचे प्रफुल्ल पाटील यांनी सेंद्रिय शेती तसेच त्यासाठी शासनातर्फे दिली जाणारी मदत, त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सविस्तरपणे सांगताना सद्यःस्थितीत देशातील शेती, शेतकरी, शेतमजूर व कृषी उत्पन्न आदींची स्थिती रासायनिक खते, कीटकनाशकांचा बेसुमार वापर यामुळे दयनीय झाली आहे. आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या सेंद्रिय व सकस शेती करीत असल्याने आपल्या मुला-बाळांचे आरोग्य निरामय राहत होते, हे विसरून चालणार नाही, असे सांगितले.
भूषण पाटील यांनी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा रायझोबियम, बीज प्रक्रिया याबद्दलची माहिती संक्षिप्तपणे शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्याचप्रमाणे शासनाच्या त्यांच्या मंडळांतर्गत त्यांच्या गावात सुरू असलेल्या जैविक शेतीबद्दलच्या विविध उपक्रमांची माहितीही शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचे महत्त्व सांगणाऱ्या पॉम्प्लेटचेही वितरीत करण्यात आले. तसेच भूमी सुपोषण राष्ट्रीय चळवळीच्या जनजागर अभियानाची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती देण्याचे आवाहनही केले.
या गावांनाही दिली जनजागर रथाने भेट
भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीच्या जनजागर रथाने कृषी विभागाच्या बहुमोल सहकार्याने अमळनेर तालुक्यातील कन्हेरे या गावासह मंडळातील फापोरे बुद्रुक, हिंगोणे खुर्द, सडावण बुद्रुक, कोळपिंप्री येथेही आज बुधवार, दि. 15 एप्रिल 2026 रोजी भेट दिली. याप्रसंगी तेथील ग्रामस्थांना एकत्र बोलावून भूमी सुपोषण राष्ट्रीय अभियान चळवळीचे महत्त्व सांगणाऱ्या पॉम्प्लेटचेही वितरीत करण्यात आले. तसेच ध्वनिक्षेपकावरून या अभियानाचे महत्त्व, कार्याची सविस्तर माहिती तसेच अन्नदात्या भूमीमातेचे महत्त्व पटवत जैविक शेतीला प्रोत्साहन देणे कसे महत्त्वपूर्ण आहे, हे शेतकरी बांधवांना समजावले. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरणही करण्यात आले.

Related Posts

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
जळगाव

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

खळबळजनक : अश्लिल व्हिडीओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाची ९ लाखांत फसवणूक !

August 9, 2026
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group