• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वृक्षदिंडीद्वारे अनुभवला वाकोदकरांनी भूमिपुत्राचा जन्मसोहळा

विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचा सहभाग; 12 सरपंचांचा गौरव

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 12, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वृक्षदिंडीद्वारे अनुभवला वाकोदकरांनी भूमिपुत्राचा जन्मसोहळा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ डिसेंबर २०२२

वाकोदचे नाव जगाच्या पाठीवर पोहचवणारे खऱ्या अर्थाने गाव आदर्श करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणारे ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ याप्रमाणे कृतिशील आचरण करणारे या गावाच्या भूमीत जन्माला आले हे गावचे भाग्य असल्याचे मत भूमिपुत्र तथा ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री डॉ भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. यावेळी भव्य ग्रंथ पालखी व वृक्षदिंडी सोहळ्यातून भूमिपुत्राचा जन्मसोहळा वाकोदकरांनी अनुभवला.

वाकोद हे श्रद्धेय भवरलाल जैन यांचे जन्मगाव. याठिकाणी मोठ्या उत्साहात वृक्षदिंडी, ग्रंथ पालखी भवरलालजी जैन यांची ग्रंथसंपदा ठेऊन विद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढण्यात आली. बैल गाडीवर भवरलाल जैन यांची प्रतिमा ठेऊन भजनी मंडळीच्या साह्याने टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून भूमिपुत्राचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. या अभियानात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय तसेच गौराई कृषी तंत्र निकेतन व विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच ग्रुप ग्रामपंचायत वाकोद, जैन फार्म वाकोद यांचे सर्व सभासद कर्मचारी व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रभात फेरीचे ठिकठिकाणी रांगोळया काढून पूजा करुन स्वागत करण्यात आले. माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पोलिस पाटील संतोष देठे, शिरीन शेख यानी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाकोद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आजच्या दिनानिमित्त गावातील नूतन व्यापारी संकुलला कर्मवीर पंढरीदादा पवार व्यापारी संकुल असे नाव देण्यात आले तर जुन्या व्यापारी संकुलला पद्मश्री डॉ. भवरलाल जैन व्यापारी संकुल असे नामकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नागरिक तुकाराम जाधव व सरपंच सौ. सरला संजय सपकाळे यांच्याहस्ते झाले तसेच भारतीय निवडणूक आयोगाच्या पुस्तकात वाकोद येथील शिरीन शेख यांचा लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल तिचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महावीर गुळेचा यांनी केले. प्राचार्य डी. आर. चौधरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी किशोर इंगळे, डॉ. चौधरी, प्रकाश लुंकड, बाबुराव आस्कर, प्रमोद जैन, प्रदीप पाटील, मोहन देशमुख, अभय लोढा, बालु पांढरे, शेख मुस्ताक, मधुकर काटे, विजय भोसले, प्रमोद राऊत, अरूण पाटील, संजय धोबी शेख ईला शेख गुलाब, संदीप जैन, रमेश देठे यांच्यासह जैन फार्म चे सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

पंचक्रोशितील सरपंचांचा गौरव
वाकोद येथे मिरवणूकीच्या समारोपाप्रसंगी वाकोदसह पंचक्रोशितील 12 गावच्या सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन इरिगेशनच्या वतीने मदन लाठी, वाकोद जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, तोंडापूर मंडळ अधिकारी एस. बी. तिर्थंकर, वाकोद तलाठी ज्ञानेश्वर घुरके, नितीन राठोड, रमेश छाजेड, महेश देशमूख, अनिल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंडीत पाटील यांची उपस्थिती होती. त्यांच्याहस्ते संजय सपकाळे, संजू बनसोडे, श्रीराम पाटील, मुरलीधर शेळके, जगदीश पाटील, संजय पाटील, अनिल गायकवाड, दिलीप रदाळ, राजमल भागवत, शंकर जाधव, रामेश्वर पाटील, राजूभाऊ राजपूत यांचा शाल, श्रीफळ व ‘एक न संपणारा प्रवास ग्राम विकास’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद
जळगाव ग्रामीण

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026
आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी
क्राईम

आषाढी वारीवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ट्रॉलीला ट्रकची धडक, एक ठार, १५ जखमी

July 1, 2026
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group