मुंबई : वृत्तसंस्था
फोन टॅपींगप्रकरणी ईडीकडून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली. यापूर्वी पांडे यांची ईडीने चौकशी केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
एनएसई फोन टॅपींग प्रकरणी संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरु होती. त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज हजर राहण्यासाठी त्यांना समन्स पाठवले होते.
The Enforcement Directorate (ED) today arrested former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in connection with National Stock Exchange (NSE) co-location scam case: ED
(File Pic) pic.twitter.com/KkJJwvSPD4
— ANI (@ANI) July 19, 2022
गेल्या आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती. नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने गुन्हे दाखल केले आहेत. संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान एनएसई घोटाळ्याप्रकरणी संजय पांडे यांच्या कंपनीचा समावेश असल्याचे आरोप त्यांच्यावर होते. त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचेही आरोप आहेत. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात आली. यानंतर ईडीने आज त्यांना अटक झाली.




















