जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तथा माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी जळगावहून मुंबई येथे हलविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृती आज दि.५ रोजी दुपारी अचानक प्रकुती खालावली होती. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांना उपचारासाठी आणले जाणार असल्याची माहिती आहे. दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचे समजतंय.
मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास एकनाथ खडसे यांना छातीमध्ये दुखू लागलं होतं. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळते. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे खडसेंना उपचारासाठी मुंबईत आणणार असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना याबाबात सूचना दिल्या आहेत.
माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना गेले दोन दिवस अस्वस्थ वाटतं असल्याने जळगाव येथे रुग्णालयात दाखल केले असून सावधगिरी म्हणून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला नेले जाणार आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. काळजीचे कारण नाही.