जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
राज्यातील शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादीतून देखील अजित पवारांचा गट बाहेर गेला होता. त्यावर विरोधकांनी तुफान टीका केली असतांना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मोठा दावा केल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काय होणार असा प्रश्न निर्माण होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रथम साथ दिली आहे. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या विचाराला मराठीजनता उत्स्फुर्त प्रतिसाददेत आहेत. जवळपास १५ ते २० आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्यासाठी आपल्याशी संपर्क साधूनआहेत, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
शरद पवार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.जनतेशी त्यांची नाळ जुळू लागली. त्यावेळीभाजपने कटकारस्थान करून प्रथमशिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येउभी फुट पाडून राजकीय पक्ष पळवण्याचाकिंवा चोरण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री वसध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकेला आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीकाँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झालीअसली तरी जनमानसातील स्थान या दोन्हीपक्षाचे उंचावले गेले आहे, असाविश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.